बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी सरकार वाहून जाईल”

रायपूर | छत्तीसगडमधील भाजप सरचटणीस डगुबत्ती पुरंदेश्वरी यांनी एका आयोजित केलेल्या चिंतन शिबीरमध्ये केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी पुरंदेश्वरी यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष बाब म्हणजे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि त्यांच्या कॅबिनेटचा उल्लेख करताना पुरंदेश्वरींनी हे वक्तव्य केलंय.

आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना 2023ची निवडणूक जिंकण्यासाठी काम करण्याचं आवाहन पुरंदेश्वरींकडून करण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना भाजप सरकारच्या कार्यकर्त्यांची संख्या इतकी आहे की नुसतं थुंकलं तरी हे सरकार वाहून जाईल, अशा खोचक शब्दात पुरंदेश्वरींनी बघेल सरकारवर टीका केली आहे.

शिबीरमध्ये बोलताना पुरंदेश्वरींनी बघेल सरकारकडून आदिवासींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच छत्तीसगडमधील जनता सत्ताधारी सरकारला योग्य उत्तर देईल, असं देखील त्या म्हणाल्या. तसेच तुम्ही सर्वांनी मिळून काम करण्याचं आवाहन करत असल्याचं पुरंदेश्वरींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट केलंय.

दरम्यान, आपल्याला पुरंदेश्वरींकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, असं मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी म्हटलं आहे. तसेच कोणी आकाशात थुंकलं तर ते त्यांच्याच तोंडावर पडतं, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

शिक्षक भरतीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुलाखतीद्वारे भरणार तब्बल ‘इतक्या’ जागा

प्रविण कुमारची दमदार कामगिरी! अवघ्या 18 व्या वर्षी पटकावलं रौप्यपदक

सिद्धार्थ शुक्लावर आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार; चाहत्यांवर दु:खाचा डोंगर

सीबीआयचा लीक झालेला ‘तो’ अहवाल खराच; राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दावा

‘सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं होऊच शकत नाही’; ‘या’ व्यक्तीच्या दाव्यानं प्रकरणाला नवं वळण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More