बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्या गोळ्या जरी घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नाही- गोपीचंद पडळकर

सोलापूर | सोलापुरमध्ये भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना घडली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआय कॉलनी, मड्डे वस्ती भागात बैठकीसाठी आले असता अज्ञात युवकाने त्याच्या गाडीवर दगडफेक केली. यानंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधताना या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

मी स्वत: या संदर्भातील तक्रार देणार नाही. आज माझा आवाज बंद करण्यासाठी गाडीवर दगडफेक करणार असेल, याला मी भीती वगैरे दाखवावी असा गैरसमज झाला असेल, उद्या मला गोळ्या जरी घातल्या तरी मी विचारांपासून मागे हटणार नाही, असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

मड्डे वस्तीत झालेल्या बैठकीनंतर मी गाडीत बसलो. गाडी वीस पावलंही पुढे गेली नाही तर गाडीवर दगड टाकला आणि ते लोक पळून गेले. या ठिकाणी माझी कोणाशी ओळख नाही, शत्रूत्व नाही. ज्यांनी कोणी केलं असेल किंवा ज्यांना कोणी करायला लावलं असेल त्यांना राज्यातील लोकं जाणतायत, असं पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादीचा असा पहिल्यापासूनचा उद्योग सुरू आहे. कोणालातरी पुढे करायचं आणि त्याचं चित्र वेगळं दाखवायचं. मला रोज त्यांचे फोन येतात, मेसेज येतात. परंतु मी त्यांना उत्तर देत नाही. हे कोणी केलं हे माहित नाही. पोलीस तपास करतील, असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

आषाढीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय- संभाजी भिडे

‘…पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल’; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

“…तर किसान सभा राज्य सरकारचा कठोर प्रतिकार करेल”

लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे उद्या लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ब्रेक!

मोठी बातमी! सोलापुरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More