महाराष्ट्र मुंबई

आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर

मुंबई | विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेचे काम करतच राहणार आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असं अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी सांगितलंय.

प्रमाणे बाॅलीवूडमध्ये लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लाेकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून टि्वट करणारी नेता बनायची माझी इच्छा नाही, असं ऊर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

कोणत्या पदासाठी शिवसेनेत आलेली नाही. काँग्रेसमध्ये होते तेव्हाही लोकसभा उमेदवारीची अपेक्षा केली नव्हती. काँग्रेससाठी प्रचार करूनही मी समाधानी राहिले असते, असं ऊर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या कोट्यातून ऊर्मिला मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाची शिफारस केली आहे. यावर अद्याप राजभवनातून निर्णय आलेला नाही.

थोडक्यात बातम्या-

नाईट कर्फ्यूवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“शेतकऱ्यांना खुनी-दंगलखोर ठरवणं, लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?”

राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये खळबळ

शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत- राहुल गांधी

“राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या