बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही”

नवी दिल्ली | राम मंदिरासाठी राम मंदिर ट्रस्टने जी जमीन खरेदी केली, त्या जमिनीच्या व्यवहारात घोटाळा आहे. असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच ट्रस्टने दोन कोटी रूपयांची जमिन 18.5 कोटी रूपयांमध्ये खरेदी केली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हा सगळा व्यवहार फक्त 10 मिनिटांत झाला आहे.

त्यांनी हे सगळे आरोप केल्यानंतर त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. याची माहिती स्वत: संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. तसेच त्या ट्विटमध्ये माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपवाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी चालेल, असं म्हटलं आहे.

संजय सिंह यांनी ट्विटसोबतच यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या नावावर इतका मोठा घोटाळा ऐकून तर पायाखालची जमीन निसटून जाईल. हा देशातील कोट्यवधी लोकांच्या आस्थेवर आघात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राममंदिर ट्रस्टचे महासचिव ‘चंपत राय’ यांच्या इशाऱ्यावर देवाण-घेवाण केली गेली होती. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय रजिस्ट्रीचे साक्षीदार असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे. या व्यवहाराची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

अनोखं संशोधन! आसपास कोरोना रुग्ण असेल तर 15 मिनिटांत वाजणार अलार्म

मनसुख हिरेन प्रकरणातील स्फोटकांनी भरलेल्या कारचं लातूर कनेक्शन उघड

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार चाहत्यांच्या भेटीला

‘तू तर अंतर्वस्त्र घालायची विसरली’, बोल्ड लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री होतेय ट्रोल

शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More