बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनलॉक केलं असलं तरी, निष्काळजीपणा अजिबात नको”

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून सगळीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. परंतू आता देशात सगळीकडे कोरोना रूग्णांची संख्या हळू-हळू कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे अनेक राज्यात कोरोना काळात बंद केलेले उद्योग-धंदे सुरू करण्याच्या प्रक्रिया सुरू आहे.

त्यामुळे केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना परिस्थितीबाबत सतर्क केलं आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानं बाजारपेठा आणि इतर सेवा देखील पुन्हा पूर्ववत होत आहेत. परंतू, असं असलं तरी कोरोनाला निमंत्रण देऊ असा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा बाळगता कामा नये, असं त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

तसेच केंद्र सरकारनं जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन होईल, याची जबाबदारी सुयोग्य पद्धतीनं पार पाडली पाहिजे. यासोबतच चाचण्या, ट्रेसिंग आणि उपचार या सरकारच्या रणनितीवर भर देण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यानं स्थानिक पातळीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अनलॉक संदर्भातील निर्णय घेतले आहेत. मात्र निर्बंध पुन्हा लादावेत की, नको याचा संपूर्णपणे निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा, असंही पत्रात लिहिलं गेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सावधान! फिरायला जाणाऱ्यांना आता 15 दिवस होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा दणका

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More