बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही- रमेश चेन्निथला

तिरुअनंतपुरम | केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. केरळमध्ये 6 एप्रिलला मतदान होणार आहे. केरळमध्ये सध्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट सत्तेत आहे. निवडणुकीच्या पूर्वी होत असलेल्या सर्व्हेमध्ये डाव्या पक्षांची सत्ता येण्याचा अदांज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी सर्व्हेचा अंदाज फेटाळला आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह आले तरी भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला आहे.

रमेश चेन्निथला यांनी केरळमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. डाव्या पक्षांच्या सरकारविरोधात लोकांमध्ये संताप आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास चेन्निथला यांनी व्यक्त केला.

केरळमध्ये भाजप यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रमेश चेन्निथला यांनी भाजपचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह आले तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. भाजपला केरळमध्ये यश मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये, असं चेन्निथला म्हणाले.

दरम्यान, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामुळे काँग्रेसनं 160 जागांपैकी 55 जागावंर नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनवला आहे. काँग्रेसनं केरळमध्ये सत्तेत आल्यास न्याय योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ कारणामुळे महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का?- अतुल भातखळकर

धक्कादायक! मास्क न घालणाऱ्यांकडून करत होती वसुली, तेवढ्यात तीचं बिंग फुटलं!

माझा नाही तर कोणाचाच नाही! संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाऊल

…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी

अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आदळला पक्षी, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More