बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मनसेचा गंभीर इशारा

मुंबई | राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्याचं पहायला मिळालं. यावरुन संपूर्ण राज्यभर गदारोळ सुरु झाला. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. अद्यापही राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं जात आहे.

भोंग्याचा मुद्दा आक्रमक झाल्यापासून राज ठाकरेंना आणि मनसे नेत्यांना अनेक धमक्या येत आहेत. याप्रकरणी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandagaokar) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse patil) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला पहायला मिळाला.

राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी, आम्ही राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सिक्युरीटी मागत आहोत, राज्य सरकारला जमत नसेल तर याची दखल केंद्र सरकारनं घ्यावी, असंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

दरम्यान, भोंग्याचा विषय झाल्यापासून धमक्या येत आहेत, त्यापैकीच एक पत्र आलं आहे. यात मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून राज ठाकरे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पत्रानंतर गृहमंत्र्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत तातडीची पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! एमपीएससीकडून ‘इतक्या’ पदांसाठी भरती

‘त्या 28 भाजप नेत्यांची प्रकरणं उघड करणार’; संजय राऊतांचा गंभीर इशारा

राजद्रोहाच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

सोमय्यांना आणखी एक झटका; राऊतांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदललं?, वाचा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More