बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मांजर आडवं गेले तरी…’; नितेश राणेंच्या म्याव म्याववर शिवसेनेचं टीकास्त्र

मुंबई | राज्यातील पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. अशातच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काही अजब प्रकार घडल्याचं पहायला मिळालं. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापलं.

आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पाहून म्याऊ… म्याऊच्या घोषणा दिल्या. त्यांची घोषणा ऐकताच भाजप नेत्यांमध्ये एकच हशा पिकला. आता या सगळ्या प्रकारावर शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे विधानपरिषद आमदार डॉ. मनिष कायंदे यांनी ट्विट करत राणेंना टोला लगावला आहे. ‘मांजर आडवं गेले तरी थांबू नये, ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तंतोतंत पाळली!’, असं ट्विट डॉ. मनिष कायंदे यांनी केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी नितेश राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, 5 दिवसांचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये वादावादी पहायला मिळत आहे. अनेक मुद्द्यांवरुन हमरीतुमरी होत आहे. त्यामुळे आणखी काय आरोप-प्रत्यारोप पहायला मिळणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

धक्कादायक! Omicronपासून वाचण्यासाठी आता एका व्यक्तीला मिळणार ‘इतके’ डोस

मस्तच ना! आंतराळातील हेअर कटिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ

Omicronच्या धास्तीनं राज्यात नवे निर्बंध, आजपासून नवे नियम लागू

मुस्लीम आरक्षणावरून इम्तियाज जलील-नवाब मलिक आमने सामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More