बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्रीवादळ टळलं तरी मुंबईसह उपनगरात ‘हे’ तास धोक्याचे 

मुंबई | दोन दिवसांपासून मुंबईवर घोंगावत असलेलं तौक्ते चक्रीवादळाचं संकट टळलं आहे. तरी, त्याचा प्रभाव आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे. मुंबई आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर 80 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. सोमवारी रात्रभर ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावल्यामुळं झाडं कोसळून पडली. तर, कुठे विज पुरवठा खंडीत झाला आहे. आज दुसऱ्यादिवशी सुद्धा पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. बोरीवली, सांताक्रुझ, चेंबूर, मुलुंड, कुलाबा, मुलुंडसह संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता आहे. हवामानाचा हा अंदाज सकाळी 7 ते 10 पर्यंतचा आहे.

मुंबईत चक्रीवादळामुळं शहरात 104 , उपनगरात 114 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आणि उपनगरात 50 ते 60 किमी वाऱ्याचा वेग नोंदवला गेला आहे. तर, कुलाबा येथे 114 किमी वाऱ्याचा वेग नोंदवला आहे. काही ठिकाणी भिंती तर काही ठिकाणी घराचा भाग पडला आहे. 479 ठिकाणी झाडं, झाडाच्या फांद्या तुटण्याची नोंद झाली आहे. मढमध्ये जेटी बोट बुडण्याने 5 जण समुद्रात पडले होते. त्यापैकी 4 सुखरूप बाहेर आले आहेत. तर एकजण बुडाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे. तर हाजी अलीजवळ 11 लहान बोटी बुडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुंबईजवळील वसईत चक्रीवादळात दोन जणांचा मृत्यू आणि एक जण जखमी झाला आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाबरपाडा येथे एका रिक्षावर झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. तर, दुसरीकडे भोयदापाडा येथे इमारतीच्या भिंतीची वीट डोक्यात पडून कॅन्टींगमध्ये काम करणाऱ्या अलगु प्रसाद यादव या मजुराचा मृत्यू झाला आहे. वालीव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

पुणे हादरलं! एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची आत्महत्या

6 दिवसात कोरोना रुग्णाचं बिल 1.83 लाख, 1.18 लाख भरुनही स्कूटी केली जप्त

अखेर तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलं; मुंबईत 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

कोरोना पॅाझिटिव्ह आल्यानंतर किंवा बरं झाल्यानंतर लगेच लस का घेत नाहीत?

वडिलांना जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये म्हणून ती वाटतेय मोफत ॲाक्सिजन सिलेंडर!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More