नवी दिल्ली | सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरीही सरकारने यावर अद्याप कोणताही तोडगा काढला नाही. अशातच भाजप नेते आणि हरियाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. या आंदोलनात आतापर्यंत झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेनूसार झाला आहे. शेतकरी त्यांच्या घरी असते तरी ते मेलेच असते ना, असं वादग्रस्त वक्तव्य करत जे. पी. दलाल यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडवली आहे.
जे. पी. दलाल यांनी आंदोलकांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर देशभरातून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. तसंच त्यांनी संपूर्ण आंदोलक शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी जे. पी. दलाल यांनी केली आहे.
दरम्यान, या आंदोलनात आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. तसेच उन्हाळ्यात शेतकरी आंदोलन टिकवण्यासाठी एसी आणि कुलरची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी सरकारने आम्हाला विजेचा पुरवठा करावा, अशी मगणीही राकेश टिकैत यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!
रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांकडून मंत्रिपदाचा राजीनामा?
प्यार किया तो डरना क्या?, ‘त्या’ दोघींनी त्याची चक्क वाटणी करुन घेतली