बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला अटक केली तरी आमचा हा लढा सुरूच राहील”

ठाणे | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच आरक्षण नाकारल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हाक्कांच राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आज सकाळपासून भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पोलीस आले आणि सुरू असलेलं चक्का जाम आंदोलन थांबवलं. त्यावेळी पोलिसांनी भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांना अटक केली आहे.

प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी मविआ सरकारने अटक केली तरी देखील आमचा हा लढा सुरूचं राहील, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. तसेच जोवर ओबीसी समाजाचं सन्मानाचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रविण दरेकर यांच्या व्यतिरीक्त आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येतं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा बंदीराष्ट्र बनवू पाहतायत”

केंद्र सरकारचा करदात्यांना माेठा दिलासा; अनुराग ठाकूर यांनी दिली महत्वाची माहिती

कोरोना लस न घेणं पडू शकतं महागात; धक्कादायक माहिती आली समोर

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

कोण राजे?, मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More