Top News जळगाव महाराष्ट्र

राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा प्रमुख फोडला तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण…- राम शिंदे

अहमदनगर | एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर भाजपमधील अनेकांच्या त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा प्रमुख साक्षीदार तरी आता त्याचा उपयोग होणार नाही, या घोट्याळ्यातील आरोपींवर निश्चित कारवाई होईल, असं म्हणत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

राम शिंदे म्हणाले की, “एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना सिंचन घोटाळ्याचे ते प्रमुख होते. ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात असून खडसेंची साक्ष होऊन गेली आहे. त्यामुळे आता या साक्षीदाराचा काही उपयोग होणार नाही”.

10 ते 12 आमदार संपर्कात आहेत, असं जयंत पाटील म्हणाले होते. परंतु एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसेंसोबत गेला नाही. तसंच कोणीही भाजप सोडणार नसल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी? असा सवाल राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

धूम स्टाईलप्रमाणे खासदार उदयनराजेंनी मारला बाईकने फेरफटका!

वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न होतोय- कंगणा राणावत

बिहारमधील जवान शहीद झाले तेव्हा मोदींनी काय केले?; राहुल गाधींचा सवाल

आता खैर नाही, मी खडसेंना कोर्टात खेचणार- अंजली दमानिया

“…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या