बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पेशंट मरत असेल, तेव्हाही तुम्ही त्याला भगव्याचं रक्तचं देणार का?”

मुंबई | कंगणाच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केल्यानंतर आता विक्रम गोखले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विक्रम गोखले यांनी माझा देश भगवाच राहील. हिरवा कधी होणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुनावलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले आहेत, “कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे, हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर हिरव्याचच रक्त देणार का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

यापुढे कोल्हे म्हणाले, “मानवता ही या सर्वांच्या पलिकडची गोष्ट आहे, वसुदैव कुटूंबकम ही आपल्या संताची शिकवण आहे. एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गाता दुसरीकडे मात्र वसुदैव कुटूंबकम या संताच्या शिकवणीला तिलांजली देत आहात”, असंही त्यांनी सुनावलं आहे.

विक्रम गोखले म्हणाले होते, “सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. तरुणाईला गाफिल ठेवण्यासाठी जाणीवपुर्वक इतिहास बदलण्याचं षडयंत्र चालू आहे. या दृष्कृत्यांना आळा घालण्याची वेळी आली आहे, असं म्हणत त्यांनी माझा देश भगवाच राहिल, हिरवा कधीही होणार नाही,” असं विधान केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“निवडणुका जवळ आल्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला”

“बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”

हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या; कस्टम विभागाकडून मोठी कारवाई

ॲमेझॉनवरून चक्क करण्यात येत होती गांजा तस्करी, असा झाला पर्दाफाश

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 9 महिन्यानंतर मोठी घट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More