बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”

नांदेड | राज्यात मुंबईतील कथित कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना हर्बल तंबाखू असल्यामुळं अटक केली होती, असं मागील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. त्यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना पत्र लिहीत राज्यात हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्यात या प्रकरणावरून टीकाटिप्पणी होताना दिसत आहे.

एका मंत्र्याचा जावाई गांजा विकताना सापडला होता. पण एक मंत्री म्हणतो, की ही हर्बल तंबाखू आहे. मग त्यावर आमचे सदाभाऊ खोत म्हणाले, की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांना देखील हर्बल तंबाखू लावण्याची परवानगी द्यावी. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे अवस्था चांगली होईल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील लोक कशामध्ये भ्रष्टाचार करतील याचा काही नेम नाही. ज्यामध्ये जमेल त्यामध्ये खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईट आहे. अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं आहे. पण या सरकारनं शेतकऱ्यांना काहीच मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात आणि मोठ्या घोषणा करतात. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत, की काहीही झालं तरी केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणतील अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

दरम्यान, देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस कंबर कसताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

थोडक्यात बातम्या –

अफगाणिस्तानवर पुन्हा संकट! संयुक्त राष्ट्र संघाने दिला ‘हा’ गंभीर इशारा

“जातीचा बोगस दाखला दाखवून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली”

इंग्लंडचा तारणहार आला! ‘या’ धाकड खेळाडूचं लवकरच संघात पुनरागमन

“देवेंद्र फडणवीसांच्या काळात कायद्याचा धाक होता, तेव्हा…”

“भाजप व्हायरसविरोधात ममता बॅनर्जी नावाची लस प्रभावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More