देश

वर्षभरात 50 संकटं आली तरीही डगमगून जायची गरज नाही- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | यंदाच्या वर्षात देशात एकामागून एक संकटं येत गेली. अशी संकटं येतचं असतात म्हणून संपूर्ण वर्ष खराब मानायची गरज नाही. वर्षभरात एक किंवा पन्नास अडचणी येऊ द्या त्यामुळे डगमगून जायची गरज नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या वैश्विक महामारीवर आपल्या खूपच चर्चा झाल्या. मात्र या काळात मी पाहतोय की लोक एका विषयावर जास्त चर्चा करीत आहेत ते म्हणजे हे वर्ष कधी संपेल. कोणी कोणाशी फोनवरुन संपर्क करत असेल तर त्यांच्या चर्चेलाही याच विषयापासून सुरुवात होत आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी पूर्व किनारपट्टीवर अम्फान तर पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ आलं. तर काही ठिकाणी आपले शेतकरी बांधव टोळधाडीने त्रस्त आहेत. तसेच देशातील काही भागांमध्ये छोटे-छोटे भूकंप थांबायचे नावच घेत नाहीत. या सर्वांमध्ये आपल्या शेजारील देशांकडूनही काहीतरी सुरु आहे. अशा प्रकारची एकाच वेळी आलेली संकट खूपच कमी ऐकायला पहायला मिळतात, असं मोदींनी सांगितलंय.

भारतात अनेक अडचणी आल्या तेव्हा नव्या गोष्टींची निर्मिती झाली, नवं साहित्य रचलं गेलं, नवे शोध लावले गेले, नवे सिद्धांत निश्चित झाले. भारत कायमच यशस्वीतेच्या शिड्या चढतच राहिला याच भावनेने आजही आपल्याला पुढेच जात रहायचं आहे, असं मोदी म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

चंद्रकांत पाटलांना पहिल्यांदा चंपा कुणी म्हटलं? अनिल गोटेंनी जाहीर केलं ‘त्यांचं’ नाव

देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

महत्वाच्या बातम्या-

कोरोनातून मुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला फसवलं त्यांना हे सरकार शिक्षा करणारच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“कोरोनाचे मृत्यू लपवायचेच असते तर…..” राजेश टोपे यांनी केला खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या