“ते खाकी पॅन्ट घालून आले तरी…”
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी गुरूवारी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावरून आता संजय राऊतांनी(Sanjay Raut) शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे.
राऊत म्हणाले की, रेशिमबागला जाणं काही चुकीचं नाही. हिंदूत्ववादी संघटना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोड्यानं जात असतील तर चांगलंच आहे.
काही दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात खाकी पॅन्ट घालून आले तरी मी त्यांचं स्वागत करेल, असा टोलाही राऊतांनी यावेळी शिंदे-फडणवीसांना लगावला.
तसेच गुरूवारी मुंबई महापालिकेतील सर्वच कार्यलये सील करण्यात आली आहेत. या मुद्द्यावरूनही राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसखोरांची टोळी घुसली आहे. महापालिकेमधील कार्यालय कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या नियमान सील केलं आहे?, असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, बुधवारी महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटानं ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.