बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

लातूर | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन चालू आहे. संभाजी पाटील 72 शेतकऱ्यांना सोबत घेऊन या आंदोलनाला बसले आहेत. आंदोलन सुरू होऊन आता 36 तास उलटले असले तरी शेतकरी आणि संभाजी पाटील जाग्यावरून हलायला तयार नाहीत. अशातच आता काही शेतकऱ्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठींबा मिळत असल्याचं दिसत आहे. आंदोलनात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांची तब्येत खालावत आहे. आंदोलन करणारे शेतकरी मुरलीधर सूर्यवंशी यांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना दवाखान्यात जायची विनंती करण्यात आली. त्यावर, भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, इथंच मेलो तरी चालेल पण मागं हटणार नाही, असं सूर्यवंशी यावेळी म्हणाले, पण डाॅक्टरांनी आणि तेथील आंदोलकांनी सूर्यवंशी यांना दवाखान्यात दाखल केलं.

आंदोलन करत असलेल्या 2 शेतकऱ्यांची तब्येत आतापर्यंत बिघडली असल्यानं प्रशासन आंदोलनाकडं लक्ष ठेवून आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही, असं संभाजी पाटील म्हणाले आहेत. परिणामी लातूरच्या आंदोलनाकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. मायबाप सरकारनं डोळे उघडण्याची आर्त हाक संभाजी पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, लातूर पोलिसांनी या आंदोलकांंना नोटीस बजावली आहे. तर लातूर जिल्हा वकील मंडळानं पाठिंबा दिल्यानं आम्हाला नोटिशीची चिंता नसल्याचं संभाजी पाटील म्हणाले आहेत. 72 तास अन्नत्याग आंदोलन चालणार असल्यानं नागरिक शेतकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी करत आहेत.

 

पाहा ट्विट 

 

थोडक्यात बातम्या 

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

नात्याला काळिमा फासणारी घटना, सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार

“बहुजन आधीच उपाशी, त्यात…”; मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे संतापल्या

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More