बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरी बसून खायचं म्हटलं तरी जास्तीचे पैसे मोजावे लागणार, नवीन वर्षात लागणार ‘हा’ नवा नियम

नवी दिल्ली | एकंदरीतच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे. त्यातच आता ऑनलाईन फुड डिलिव्हरी अॅपवरून (Online Food Delivery) खाद्यपदार्थ ऑर्डर करणं देखील महागणार असल्याचं समोर आलं आहे. कारण आता केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार फुड डिलिव्हरी अॅपवरती 5 टक्के कर लावण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या 1 जानेवारीपासून देशभरात हा नियम लागू केला जाणार आहे. स्विगी, झोमॅटो यांसारख्या सर्व फुड डिलिव्हरी अॅपला हा नियम लागू असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या संदर्भात ही बैठक होती.

मागील अनेक दिवसांपासून फूड डिलीव्हरी अॅप्सच्या सेवांना GST कक्षात आणण्याची मागणी सुरु होती. अखेर 17 सप्टेंबरला झालेल्या वस्तू व सेवा कर संदर्भातील बैठकीत या मागणीवर शिक्कामोर्तब झाला. निर्मला सितारामण यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.

दरम्यान, आता या कराचा बोजा नेमका ग्राहकांवर पडणार की कंपनीवर? हा प्रश्न कायम आहे. परंतु केंद्र सरकार हा कर पुर्णपणे ग्राहकांकडून घेणार नसल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकार हा कर फूड डिलिव्हरी अॅप्सनाच आकारणार आहे. परंतु हे डिलिव्हरी अॅप्स हा कर कोणत्या ना कोणत्या मार्गान ग्राहकांकडूनच वसूल करणार.

थोडक्यात बातम्या-

एसटी संप मागे! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची मोठी घोषणा

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

जिवा शिवाची बैल जोड़! रावसाहेब दानवेंचा पत्नी आणि नातीसह बैलगाडीतून फेरफटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More