देश

हाडे गोठवणाऱ्या थंडीतही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू, 39 दिवसांत 54 शेतकऱ्यांचा मृत्यू

नवी दिल्ली | दिल्लीत हाडे गोठवणारी थंडी आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊसही कोसळतोय. पण तरीही शहरांच्या सीमांवर शेतकरी आंदोलनाची धग कायम आहे.

कडाक्याच्या थंडीत रविवारी एका 18 वर्षीय तरुण शेतकऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला. गेल्या 39 दिवसांत तब्बल 54 आंदोलक शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत.

केंद्र सरकारने शेतकरी प्रतिनिधींना वाटाघाटीसाठी बोलावले असले तरी तीन कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपीची कायदेशीर तरतूद करावी या दोन मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे देशाचे लक्ष लागलं आहे.

शेतकरी कृषी कायदे मागे घ्या, या मागणीवर ठाम असताना सरकार मात्र कृषी कायदे मागे घेणार नाही, या मतावर अडून बसले आहे.

थोडक्यात बातम्या-

हाफ चड्डी घालून भाषणं करणं हा राष्ट्रवाद नव्हे तर…- सचिन पायलट

“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे”

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या