बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता तरी तुमच्या घरातील ‘तो’ आवाज बंद होईल’; अनुष्का शर्माच्या हटके शुभेच्छा

मुंबई | अभिनेत्री कतरिना कैफ  (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) काल अखेर लग्नबंधनात (Marriage) अडकले आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. कधी एकदा ते लग्न करताय असं त्यांच्या चाहत्यांना झालं होतं. काल 9 डिसेंबर 2021 रोजी अखेर या लोकप्रिय जोडीनं लग्नगाठ बांधली.

सोशल मीडियावर सध्या विकी-कतरिनाला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकार हटके पोस्ट टाकत त्यांना शुभेच्छा देत आहेत. अशातच आता अभिनेत्री अनुष्का शर्मानं त्यांना शुभेच्छा देत हटके पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मान इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत विकी-कतरिनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्कानं पोस्टमध्ये म्हटलं की, दोन सुंदर लोकांचे अभिनंदन. दोघांना प्रेमाने भरलेले आयुष्य लाभो हीच सदिच्छा. तुम्ही अखेर लग्न केले याचा आनंद झाला, त्यामुळे आता तुम्ही तुमच्या घरात जाऊ शकता आणि आम्हाला येणारा बांधकामाचा आवाज आता तरी बंद होईल. अनुष्काच्या या पोस्टनं अनेकांनचं लक्ष वेधलं आहे.

दरम्यान,विकी आणि कतरिनाच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. काहीच लोकांना आमंत्रण असल्यानं बाकी लोकांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? ‘या’ तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

‘लग्नाला नाही बोलवलं एकवेळ चालेल पण लग्नानंतर नाही बोलावलं तर…’; कंडोम कंपनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

“सुप्रिया ताई, मन मोठं करा अन् अजितदादांना ‘हा’ सल्ला द्या”

“चंद्रकांतदादा, अडवाणींना विचारून घ्या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचं बोट…”

आज इंधनदरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More