बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलाच्या नाकातून येणारा वासावर सर्जरी केल्यानंतर डाॅक्टरांना देखील बसला धक्का!

नवी दिल्ली |  काही लोकांच्या नाकातून घान वास येत असतो. तो वास फक्त त्यांनाच जाणवतो. मात्र, 16 वर्षाच्या एका मुलाच्या बाबतीत काही वेगळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वाॅश्गिंटन येथील आहे. त्या मुलाच्या नाकातून येणारा वास त्याच्या पर्यंत मर्यादीत नसून संपुर्ण खोलीभर हा वास दरवळत होता. त्याच्या श्वासात काही समस्या नसल्याची खात्री त्याला होती. तरी डाॅक्टरांनी या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला.

मुलाच्या नाकातल्या वासाची समस्या जास्त पसरत जात असल्यानं त्याच्या पालकांनी त्याला डाॅक्टरांकडे नेलं. काही तपासण्या झाल्यानंतर त्याची नाकाची इंस्कोपीद्वारे देखील तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याला टरबिनेट हायपोट्राॅफी झाल्याचं समजलं. तज्ञांच्या मते टरबिनेटस् हा नाकातील एक भाग असून बदलत्या वातावरणामुळे किंवा सायनसमुळे या भागावर सुज येते. असचं काहीस त्या मुलाच्या बाबतीत झाल्याचा अंदाज डाॅक्टरांनी मांडला होता. यावर उपचार होण्यासाठी त्या मुलाला स्प्रे आणि अँटिहीस्टामिन औषध देण्यात आलं. तसेच त्याला 4 ते 6 आठवड्यात पुन्हा यायला सांगितलं होत.

मुलगा एक वर्षानंतर पुन्हा डाॅक्टरांकडे गेला. तेव्हा डाॅक्टरांनी सिटी स्कॅन केलं. त्यादरम्यान त्याच्या नाकात काहीतरी गोलाकार गोष्ट असल्याचं दिसलं. त्यामुळे डाॅक्टरांनी त्याच्या नाकाची सर्जरी केली. तेव्हा त्याच्या नाकात बीबी पॅलेट म्हणजे बंदुकीची गोळी असल्याचं आढळून आलं. मुलाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानपणी त्याला गोळी लागली होती. मात्र तेव्हा त्याला कसलाही त्रास न झाल्यामुळे त्यांनी त्याला डाॅक्टरांना दाखवलं नव्हतं.

दरम्यान, या मुलाच्या नाकातली गोळीवर टिश्यू वाढले असून जर ही गोळी काढली नसती तर त्याचं इन्फेकशन जास्त वाढत गेलं असतं आणि ते जबडा आणि डोळ्यांपर्यंत गेलं असतं. एढवचं नाही तर हे इंफेक्शन हाडांना देखील घातक ठरलं असतं. मुलाच्या नाकातून गोळी काढल्यानंतर त्याच्या नाकातला वाससुद्धा गेला.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं, भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतंय”

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस

कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे

‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; रोहित पवारांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More