बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कासवाला सुद्धा लाज वाटेल, अशा गतीने ठाकरे सरकार काम करतंय”

नागपूर | राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यात विरोधी पक्ष असलेला भाजप महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहे. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामावर टीका केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळ आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आतापर्यंत हे काम होऊन जायला पाहिजे होते. मात्र, कासवाला सुद्धा लाज वाटेल, अशा गतीने महाविकास आघाडी सरकार काम करत आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. विमानतळ आणण्यासाठी शासनाशी संघर्ष करेल आणि काम झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

डिफेन्स इक्युपमेंट उद्योग लावायचे असतील तर रतन टाटा उद्योग स्थापन करण्यासाठी इच्छुक आहेत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. राजुरा तालुक्यातील अनुसूचित जाती जमातींचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न, महात्मा फुले कर्जमुक्तीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. हे प्रश्न पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून सोडवण्यात येतील, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील लोकांना गंभीर आजारासाठी नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही. तसेच गेल्या चार महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे मिळत नाही ते मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. सोयाबीन सारख्या पिकाची नुकसान भरपाई यांसारख्या अनेक प्रश्नांसाठी विधीमंडळातील संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न सोडविले जातील, असंही आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

“आरोप सिद्ध झाल्यास मी राजीनामा देतो, नाहीतर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या”

‘भाजप सत्तेसाठी इतकी हपापलेली आहे की, आता…’; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

‘बस्स झालं आता, ईडीच्या विरोधात उठाव करावाच लागेल’; छगन भुजबळ आक्रमक

सामना स्कॉटलॅंडने जिंकला पण, 12 वर्षाच्या चिमुकलीची सोशल मीडियावर चर्चा; जाणून घ्या कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More