बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वयाची 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलंय’; अजित पवारांचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला टोला

पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक भाषण शैलीसाठी ओळखले जातात. तसेच अजित पवार आपल्या भाषणात राजकीय चिमटे घेत असतात. पिंपरी चिंचवडच्या डी. वाय पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी त्यांनी राज्यमंत्री सतेज पाटील यांना टोला लगावला आहे.

सतेज पाटील यांचं वय 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं आहे. काँग्रेस पक्ष किती दिवस त्यांना राज्यमंत्री ठेवणार आहे, असा टोला अजित पवार यांनी सतेज पाटील यांना लगावला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड मनपाचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, असा दावा देखील अजित पवारांनी केला आहे. पण, पक्ष प्रवेश हा इलेक्टिव्ह मेरीटवर देण्यात येईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच ईडी जरंडेश्वर कारखान्याचा तपास करत आहे, असं अजित पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेतील भाजपचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. पिंपरी चिंचवड मनपा ही आपल्याच नेतृत्वात लढवली जाणार आहे. तसेच मी कधीही खालच्या पातळीवर उतरून राजकारण करत नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, मी माझी भूमिका मांडली आता… – रामदास आठवले

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार ‘या’ वेळेत, मंडळांनी दिली माहिती!

‘पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षात आणण्याची योग्य वेळ नाही’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण

पोरांनो तयारीला लागा! पोलीस भरतीची तारीख जाहीर, वाचा संपूर्ण माहिती

ज्यावेळेस ‘ते’ येतील त्यावेळी ते भावी सहकारी – बाळासाहेब थोरात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More