Top News अहमदनगर महाराष्ट्र

मला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी…- सुजय विखे-पाटील

अहमदनगर | खासदार सुजय विखे- पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत सुजय-विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मला लोक मला दोनच प्रश्न विचारत आहेत. तुम्ही केंद्रात मंत्री होणार का?, राज्यात बदल होईल का?, साईबाबांच्या कृपेने केंद्रात मंत्री झालो तरी मी आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहणार असल्याचं सुजय-विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप चांगले काम करतं आहे. संकट काळात भाजप पक्ष आमच्या कुटुंबामागे उभा राहिला. खासदार झालो, तरी माझ्यात काही बदल झाला नाही, तसाच तो मंत्री झाल्यावरही होणार नसल्याचं सुजय-विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच गृहमंत्री अमित शहा यांची सुजय विखेंची भेट घेतली होती. त्यामुळे या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

कोहलीच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी- गौतम गंभीर

“इंग्लंडमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा जास्त बाऊ करु नका, त्याऐवजी…”

नाईट कर्फ्यूच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक नाराज; शरद पवारांची घेणार भेट

शिवसेनेचा स्वबळाचा नारा; ‘या’ निवडणुका स्वबळावर लढवणार!

सुरेश रैना, गुरु रंधावाला मुंबई पोलिसांकडून अटक; रॅपर बादशहाचा पळून जाण्याचा प्रयत्न!

नवीन कोरोना किती धोकादायक आहे?; AIIMSचे संचालक म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या