बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”

पालघर | केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 4 नेत्यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. आता याच 4 मंत्र्यांना मोदी सरकारने महाराष्ट्रात पाठवलं आहे. हे मंत्री महाराष्ट्रात जनआशिर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय सामान्य लोकांपर्यंत पोहचवणं हा या जनआशिर्वाद यात्रेचा उद्देश आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी या जनआशिर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. या यात्रेवेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

कोणतीही गर्दी न करता या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान ग्रामीण भागातील लसीकरणाची माहिती घेणं आणि त्यांच्या समस्या जाणून घेणं हे आपलं कर्तव्य असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं आहे. कोणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, हा या जनआशिर्वाद यात्रेचा उद्देश असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

केंद्र सरकारने सर्वाधिक लसी केंद्राला उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र केंद्राने कितीही लसी राज्य सरकारला पुरवल्या तरी ठाकरे सरकारची लस देत नसल्याची तक्रारच आहे, अशी टीका डाॅ. भारती पवार यांनी जनआशिर्वाद यात्रेच्या वेळी केली आहे. या यात्रेवेळी त्यांनी गर्दी न करण्याचं देखील आवाहन केलं होतं.

दरम्यान, जानेवारीनंतर भारतात लसीकरण करण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतरच्या 7 महिन्यातच आता भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या 54 कोटीवर पोहोचली आहे. मात्र अजूनही मोठ्या जनसमुदयाला लसीकरणाची गरज आहे. काही लसीकरण केंद्रावर लोकांना 5-5 तास रांगेत उभा रहावं लागतंय. त्यामुळे लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज भासू लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

आकाशाकडे बोट दाखवत कोहली थेट रिषभ पंतवर भडकला; पाहा व्हिडीओ

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये!

काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?, वाचा एका क्लिकवर

चक्क खासदारच विसरले राष्ट्रगीत; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More