बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार”

सांगली | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संभाजीराजे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात. मात्र, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. ते इस्लामपूमध्ये माध्यमांशी बोलत होते.

तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघणार आहात की वाट लागण्याची वाट पाहणार आहात. या विषयात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आंदोलनात कोणी चाल ढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर बघू. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल बोलतील, त्यावेळी माझं उत्तर असेल. चंद्रकांत पाटील अथवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही, असं संभाजीराजे यापूर्वी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ एका व्यक्तीनं तयार केली मॅच विनर्सची फौज; बदलली आहे टीम इंडिया

देशात दीड हजारांच्या जवळपास डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांमध्ये इंटर्न डॉक्टरांचाही समावेश

“मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली अन् हिंदमाता येथे पाणी साचलंय त्याला स्मृती इराणी जबाबदार”

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भाजपमधील कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही- खासदार संभाजीराजे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More