महाराष्ट्र मुंबई

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटतं”

मुंबई | देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचं भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटतं. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटतं आणि हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जातं. राहुल गांधींचं भय त्या शंभर पटीतलं आहे, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं खासदार राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे.

राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. भाजपला मोदींशिवाय व काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय नाही हे सत्य स्वीकारावं लागेल. काही काळासाठी गांधी दूर जाताच पक्ष होता त्यापेक्षा जास्तच खाली घसरला. आता पुन्हा गांधी येत आहेत. अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी होकार दिला आहे ही बातमी पक्की होताच दुसऱ्य़ा बाजूला प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या घरी आयकर विभागाचं पथक पोहोचलं, म्हणजे वढेरा यांच्या घरावर आयकर विभागाने रेड टाकली. हा योगायोग नक्कीच नाही, असं अग्रलेखात म्हटलंय.

केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही, असा आरोपही शिवसेनेनं भाजपवर केला आहे.

जोपर्यंत राजकीय मालक इशारे करत नाहीत तोपर्यंत हे निष्ठावान लोक उगाच कुणाच्या घरी जाऊन दारावर टकटक करणार नाहीत. त्यामुळे या मंडळींना दोष देण्यात अर्थ नाही, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल भवनाबाहेर राडा, गोळीबारात महिलेचा मृत्यू

‘…तर कायमस्वरुपी बंदी आणू’; ट्विटरचा ट्रम्प यांना इशारा

“टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले”

राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढय़ात मराठी माणसांची एकजूट काय आहे हे दाखवूया- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या