बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही सरकार चालवतोय, काँग्रेसला दूर ठेवून…”

मुंबई | ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) काही दिवसांपूर्वी मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना नेत्यांची भेट घेतली होती. देशात तिसऱ्या आघाडीचे संकेत त्यांनी यावेळी दिले होते. त्यामुळे काँग्रेस आगामी निवडणुकीत एकटी पडणार असल्याचं स्पष्ट दिसत होतं. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आपली भूमिका मांडली आहे. (Saamana Newspaper Editorial)

पश्चिम बंगालमध्ये ममतांनी ज्याप्रकारे संघर्ष करुन विजय मिळवला तो विजय प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवलं होतं. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल एकाच वाटेवर आहेत. त्यामुळे 2024ला जर वेगळी आघाडी उभी राहत असेल तर काय फायदा होईल, याचा विचार करावा, असं राऊत म्हणाले आहेत.

सध्या जी आघाडी आधीपासून आहे त्याला आणखी मजबूत करा असं आमचं म्हणणं आहे.  महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर हे योग्य नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्याला आता काँग्रेस नेते देखील समर्थ देताना दिसत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस वगळता तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले होते. मात्र, महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडल्याने आता शिवसेनेने काँग्रेसचा हात धरल्याचं चित्र दिसून येतंय. त्यामुळे आता आघाडीत बिघाडी झाली की काय?,असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

‘बाबा नको जाऊ दूर…’,वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवची भावूक पोस्ट

बच्चू कडू वादाच्या भोवऱ्यात! वंचितकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

“साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला, पण पावसाला काय माहिती साहेब फक्त…”

पाकिस्तानची जगभर नाचक्की! ट्विट करत खुद्द अधिकाऱ्यांनीच केली पोलखोल

“कोण राहुल गांधी?, मी त्यांना ओळखत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More