बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 69 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 339 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 88 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 21 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1402 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,23,587 इतकी आहे. तर पुण्यात 42 हजार 907 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 864 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,73,816 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 19 हजार 336 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“बड्या राजकीय हस्तींनी मला…”; लंडनला गेलेल्या अदर पुनावालांचा धक्कादायक खुलासा

मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय कराल?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावं, मग तुम्ही काय झोपा काढताय?- चंद्रकांत पाटील

पुण्यात फार्महाऊसवर नाचगाणं, पैशांचा पाऊस अन् पोरी, पोलिसांची रेड पडताच गदारोळ

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More