बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

मुंबई | वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तन करणारी प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटीलने बिग बाॅस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. यावरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं असून वारकरी सांप्रदाय देखील तिच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे. याबाबत बोलत असतानाच शिवलीलाने केलेल्या एका वाक्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीवेळी तृप्ती देसाई सुद्धा मला विचार करुन भिडायच्या, असं शिवलीलाने म्हटलं आहे.

बुलडाणा येथे शिवलीलाचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. मात्र वारकरी सांप्रदायाने त्याला नकार दिला. यानंतर शिवलीलाने एका मुलाखतीत तिची बाजू मांडली. यावेळी मी वारकरी आहे आणि आमचा वारकरी सांप्रदाय नेहमीच शांततेच्या मार्गाने चालतो, असं शिवलीलाने म्हटलं आहे. तसेच नेहमीच शांतीत उत्तर देत असल्याने तृप्ती देसाईसुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या असं शिवलीला पाटीलने म्हटलं आहे. शिवलीलाच्या या वाक्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

एवढंच काय तर तृप्ती देसाईना काय आंदोलन करायचं ते करु द्या आम्ही वारकरी नेहमीच शांततेत उत्तर देणार, असं देखील यावेळी शिवलिलाने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवलीलाने स्वतः बिग बाॅसचं घर सोडलं आहे. मात्र घरातून बाहेर आल्यानंतर तिला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. अशातच शिवलीलाचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, बिग बाॅसच्या घरात जाऊन मी चूक केली. मात्र मी तिथं राहून वारकरी संस्कृतीचं दर्शन घडवलं, मी अभंग गायले, ज्ञानेश्वरी वाचली, असं शिवलीलाने म्हटलं आहे. तसेच बिग बाॅसच्या घरात जाऊन देखील मी माझी वारकरी संस्कृती सोडली नाही. मात्र, केवळ एक महिला कीर्तनकार असल्याने वारकरी सांप्रदाय विरोध करत असल्याचं शिवलीला यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलार संतापले

खून का बदला खूनसे! भारतीयांनी अवघ्या 24 तासांत केला दहशतवाद्यांचा खात्मा

साउथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली आई; तब्बल एक वर्षानंतर केला खुलासा

“केंद्रीय मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरले आहेत”

चौकशीदरम्यान अटक झाल्यास युवराज सिंगला जामीनावर सोडा – उच्च न्यायालय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More