बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील ‘इतक्या’ रुग्णांना डेल्टा प्लसची लागण!

जालना | सध्या कोरोनाने देशभर थैमान घातलं आहे. कोरोनाची भिती लोकांच्या मनातून कमी होत आसतानाच डेल्टा व्हेरिएंटने लोकांना पुन्हा एकदा हैराण करुन सोडलं आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशभर लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार राज्यात दोन्ही लसीचे डोस घेऊन देखील डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटची रुग्ण संख्या वाढत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या 66 वर पोहोचली आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे दोन्ही लसींचे डोस घेऊन देखील यातील 18 रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे.

जालनामध्ये आरोग्यमंत्र्यांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर आरोग्य विभागासह लोकांमध्ये देखील भिती निर्माण झाली आहे. मात्र काळजी करण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, जालनामध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत बोलताना राज्यात 80 टक्के रुग्ण आढळून आले असून यातील काही रुग्ण डेल्टा प्लसचे असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तसेच याबाबत उपाययोजना सुरु असून या रुग्णांची पार्श्वभूमी जाणून घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातील, असं देखील आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

भररस्त्यात दोन महिलांमध्ये हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आमचं ठरलंय, 2024 ला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही- संजय राऊत

कोरोना महामारीमध्ये जन्मलेल्या बालकांविषयी धक्कादायक माहिती समोर!

…नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More