बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी घ्या! दारू नाही तर ‘या’ पदार्थांमुळेही होऊ शकतं लिव्हर खराब

मुंबई | यकृत (Liver) हा शरीरातील महत्वाचा अवयव हे आपल्या संगळ्यानांचा माहित आहे. शरीरातील पदार्थ डिटाॅक्सिफाय करण्याच महत्वाचं काम यकृत करत असते. दारूचे अतिप्रमाणात सेवन केल्यास यकृतावर विपरीत परिणाम होतो. मात्र फक्त दारूनेच नाही तर याशिवाय इतर काही पदार्थांमुळे यकृतावर परिणाम होण्याची शक्यता असते. चला जाणून घेऊ ते पदार्थं कोणते आहेत.

लाल मास अर्थात रेड मीटच्या अती सेवनानेही यकृतांवर गंभीर परिणाम होतो. रेड मीट मध्ये असणाऱ्या प्रोटीनमुळे लिव्हर योग्य पद्धतीने प्रक्रिया करत नाही. ड्रायफ्रुटस हे तर आपल्या दैंनदिन जिवनात आपण सर्रास करत असतो, मात्र सुक्यामेव्याचे अती प्रमाणात सेवन केल्यास फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.

हल्लीच्या धावपळीच्या जगात पॅकेज बंद पदार्थाचा वापर वाढला आहे. हे पदार्थ जास्त काळ टिकून रहावे यासाठी यामध्ये प्रचंड प्रमाणात मीठ, साखर आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे लिव्हरवर विपरीत परिणाम होतात. हल्ली प्रत्येक जेवणानंतर डेझर्ट (Dezert) खाण्याची प्रंचड क्रेज आलीये पण अती प्रमाणात गोड खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो.

या काही पदार्थाचा तुमच्या दैनंदिन आयुष्यात वापर होत असेल तर आज पासूनच हे पदार्थ बंद करा. त्यामुळे तुम्ही मद्यप्रेमी नसाल तरीही लिव्हरच्या त्रासापासून वाचण्यासाठी या पदार्थाचे अतिसेवन आजच बंद करा

थोडक्यात बातम्या

मुलाशी मैत्री केली म्हणजे मुलीची शारीरिक संबंधांना परवानगी समजू नये- उच्च न्यायालय

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण

म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा!

पत्रकारांच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी, ‘या’ पत्रकाराला अटक!

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ‘ही’ आहे भाजपची भूमिका, मुनगंटीवार म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More