बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रेमडेसिविर, ऑक्सिजनशिवाय 85 टक्के रुग्ण बरे होतायेत”

नवी दिल्ली | अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढलीय की रुग्णांना बेड आणि आवश्यक औषधं देखील मिळणं अवघड होऊन बसलंय. अशात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषध आणि ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या परिस्थितीवर देशातील वरिष्ठ डॉक्टरांनी भाष्य केलं आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजनशिवाय 85 टक्के रुग्ण बरे होतायेत, असं एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय.

अनेक लोकांना सर्दी, घसा खवखवणे यांसारखी सामान्य लक्षणे दिसू लागल्यावर पाच ते सात दिवसांत ते उपचारांद्वारे या लक्षणांपासून बरे होतील. केवळ 15 टक्के रुग्णांना आजाराच्या मध्यम टप्प्यात सामोरं जावं लागतं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, निरोगी लोक, ज्यांचे ऑक्सिजन सेच्युरेशन 93-94 टक्के आहे, त्यांना आपले सेचुरेशनला 98-99 टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी उच्च प्रवाह ऑक्सिजन घेण्याची गरज नाही. 94 टक्क्यांहून कमी ऑक्सिजन रेच्युरेशन असलेल्या लोकांना देखरेखीची आवश्यकता आहे, असं रणदीप गुलेरिया म्हणालेत.

क्सिजन एक उपचार आहे. हा एक औषधाप्रमाणे आहे. थांबून-थांबून याचा वापर करणे काही उपयोगाचे नाही. असा कोणताही डेटा नाही, की जो दर्शवतो कोरोना रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारे उपयुक्त ठरणार आहे की नाही. म्हणून हा निरुपयोगी सल्ला आहे, असं गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 2021 च्या अखेरपर्यंत परिस्थिती स्थिर होईल. त्यानंतर 2022 च्या मध्यात संपूर्ण जग पुन्हा मोकळा श्वास घेईल, असंही रणदीप गुलेरिया म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल”

‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसला…’; शिवसेना खासदाराचा धक्कादायक आरोप

दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पुणे हादरलं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

‘महाराष्ट्राला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा’; राजेश टोपे यांची मोदींकडे मोठी मागणी

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More