बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी कुत्रा माणसाला चावला मग माणूस कुत्र्याला चावला अन् नंतर…

पाटणा | बिहारमधील एका घटनेची सध्या जोरदार चर्चा सुुरु आहे. बिहारमध्ये एका कुत्र्याने तरुणाचा चावा घेतल्यानंतर तरुणाने देखील कुत्र्याचा चावा घेतला आहे. आता दोघे कुत्रा आणि तरुण रुग्णालयात दाखल आहेत. संबंधित तरुणाचं नाव मन्नू मांझी असं आहे.

मन्नू हा 26 वर्षांचा असून त्याला लहानपणापासून कुत्री पाळायला आवडतात. काही दिवसांपुर्वीच मन्नूने एक कुत्रं आणलं आहे. या कुत्र्याने मन्नूचा चावा घेतला. संतापलेल्या मन्नूने कुत्र्याला धडा शिकवण्यासाठी कुत्र्याचाच चावा घेतला. यामध्ये कुत्र्याला दुखापत झाली आहे.

मन्नूचा राग शांत झाल्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात आली. त्यानंतर त्याने कुत्र्याला रुग्णालयात नेलं. कुत्र्याला लवकरात लवकर उपचार मिळावे म्हणून मन्नूने हाॅस्पीटल स्टाफसोबत बराच गोंधळ घातला. स्टाफने मन्नूला समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला मात्र त्याला डाॅक्टरांनाच भेटायचं होतं.

दरम्यान, डाॅक्टरांनी कुत्र्याला रेबीजचं इंजेक्शन दिलं असून त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांनी मन्नूची देखील समजूत काढली. त्यानंतर मन्नू कुत्र्याला घेऊन प्राण्यांच्या रुग्णालयात गेला.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारमुळेच कोरोना आटोक्यात, सामनाच्या अग्रलेखातुन संजय राऊतांचा हल्लाबोल

सकाळी-सकाळीच किरीट सोमय्यांच्या ट्विटने उडवली खळबळ, आज दुपारी करणार…

मोठी बातमी! नागपुरात निर्माणाधीन पुल कोसळला; अख्ख कुटूंब थोडक्यात बचावलं!

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मोठा निर्णय; राजकारणात नवं समीकरण दिसणार?

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More