Top News कोल्हापूर महाराष्ट्र

2021 सालची जनगणना ही जातनिहाय व्हावी- रामदास आठवले

कोल्हापूर | कोणत्या जातीचा किती टक्का आहे हे समजत नाही. त्यामुळे 2021 जनगणना जातनिहाय व्हावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती. यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं आठवले म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं, असं मतही रामदास आठवलेंनी मांडलं आहे. सर्वोच्च न्यायालयही मराठा समाजाचा विचार करेल, अशी आशाही आठवलेंनी बोलताना व्यक्त केली. कोल्हापुरात ते बोलत होते.

महाराष्ट्रातील काही नेते आणि विचारवंतांकडून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्याची मागणी होत आहे. मात्र त्याला आपला विरोध असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रामदास आठवलेंनी याआधी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. आता प्रत्येक जातीची जनगणना व्हावी, अशी भूमिका मांडली आहे.

थोडक्यात बातम्या-

…हे पाहून अंगी बारा हत्तीचं बळ आलंय- राजू शेट्टी

…म्हणून शरद पवार संतापले अन् चालू पत्रकार परिषदेतून माझी चूक झाली असं म्हणत गेले निघून!

ज्या देशातील शेतकरी दु:खी आहे, तो देश कधीच प्रगती करु शकत नाही- उर्मिला मातोंडकर

वाढदिवसाचा केक कापून तरुण झाला फरार; पोलिसांनी मित्रालाच ठोकल्या बेड्या!

नववीतील विद्यार्थिनीवर ८ जणांकडून बलात्कार; १३ दिवस सुरु होता धक्कादायक प्रकार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या