बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बस्स झालं आता, ईडीच्या विरोधात उठाव करावाच लागेल’; छगन भुजबळ आक्रमक

नागपूर | ईडी आणि सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय सुडबुद्धीने केला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यातच आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे.

ईडीने महाराष्ट्रात उच्छाद मांडला आहे, अधिकाऱ्यांच्या आधी भाजपच्या नेत्यांना कोणावर आणि कुठे कारवाई होणार आहे याची माहिती असते, असं म्हणत छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन ईडीच्या विरोधात आवाज उठवावा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. आता बस्स झालं. ईडीच्या विरोधात उठाव करावाच लागेल, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

ईडी, सीबीआय, एनसीबी ही नावे लहान मुलांना देखील माहित आहेत. ईडीच्या सर्व कारवाया राजकीय आहेत. फक्त आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवरचं छापे घातले जात आहेत. आजवर ईडीने ज्या- ज्या कारवाया केल्या त्याचा कोणताही तपशील नाही. त्यामुळे केवळ राजकीय आकसापोटी भाजप नेते ईडीचा गैरवापर करत आहेत, असं म्हणतं छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. आजवर कुठल्याही राजकीय पक्षाने ईडीचा इतका गैरवापर केला नसेल तितका भाजपचे नेते करत आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. भाजपचे नेते अगोदर आरोप करतात नंतर ईडीला निवेदन देतात, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते सरकार पडणार असं भाकित करत आहेत, परंतु महाविकास आघाडीने दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

पाकिस्तानविरूद्ध भारताला यश का मिळतं?, विरेंद्र सेहवाग म्हणतो…

विराटसेनेची चिंता वाढली! पाकिस्तानच्या ‘या’ दोन खेळाडूंनी सामन्याआधी दाखवला ट्रेलर

“आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं स्वागत काळे झेंडे दाखवून करा”

उस उत्पादक आणि सहकाराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय – देवेंद्र फडणवीस

”त्या’ बिहारी लोकांना मोफत AK-47 द्या’; भाजप आमदाराची अजब मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More