बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सगळे चोर आहेत, फक्त जरंडेश्वरलाच का टार्गेट केलं जातंय?”

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली होती. तेव्हापासून जरंडेश्वर कारखान्याचा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यानंतर काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याचा गैरव्यवहार झाले असल्याचा आरोप करत ईडीला याबद्दलचे पुरावे दिले आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं होतं. त्यावर आता अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे.

जरंडेश्वर कारखान्यासोबतच आणखी 43 कारखाने आहेत, मग फक्त जरंडेश्वरलाच का टार्गेट केलं जातंय? असा सवाल राजू शेट्टी यांनी किरीट सोमय्या यांना विचारला आहे. आता हे साखर कारखाने शेतकऱ्यांना मिळणार आहेत का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

गैरव्यवहार झालेल्या कारखान्याची यादी मोठी आहे, हे मी गेल्या 6 वर्षापासून सांगतोय. हे सगळे चोर आहेत, हे सरकार या चोरांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केली आहे. मी आघाडी सरकारवर नाराज आहे आणि भाजप सरकारवर खूश आहे, असं काही नाही, असंही शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, माझी वाटचाल आता अशीच असणार, जो आडवा होईल त्यांना आडवा तुडवायचं असंच आता धोरण असणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात 9 लाख कामगार आहे. गोपीनाथ मुंडे महामंडळाला सरकारने मदत करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिक म्हणतात, “मला राजस्थानमधून धमकीचा फोन येतोय, समीर वानखेडेंना…”

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी सोडलं मौन, मांडली जरंडेश्वरची कुंडली

1 नोव्हेंबरपासून व्हॅट्सअॅप होणार बंद, ‘या’ अँड्राॅइड फोनवर व्हाॅट्सअ‌ॅप होणार बंद

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

‘…त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल’; हाय होल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More