बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! थेट कारवरच उतरलं विमान… बघा नेमका काय घडला प्रकार

नवी दिल्ली | समाज माध्यमांमध्ये बऱ्याचवेळी आपण वेगवेगळे अपघात पाहत असतो. ट्रेन, बस, कार आणि दुुचाकींचे अपघात आपण पाहिले असतील. परंतु, तुम्ही कधी आकाशात झालेला अपघात पाहिला आहे का? बऱ्याचवेळा काही तांत्रिक कारणास्तव विमान किंवा हेलिकाॅप्टरचा अपघात होतो. हे अपघात फार भीषण असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

सध्या समाजमाध्यमांमध्ये एक हेलिकाॅप्टर क्रॅश होतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा मेक्सिकोमधील आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण हवाई प्रवास करण्यास घाबरतील. मॅक्सिकोमधील एक हेलिकाॅप्टर अचानक कमी उंचीवर उडत असताना खाली जमिनीवर लँड झाल्याचं पहायला मिळतंय.

हेलिकॉप्टर चालकाने अपघात रोखण्याचा प्रयत्न केला पण, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. राउटर्स या वृत्तसंस्थेने ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून हा व्हिडीओ प्रसारित केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेलं हेलिकॉप्टर मेक्सिकोमधील नौदलाचं आहे. खराब हवामान तसेच हेलिकॉप्टरमधील बिघाड यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.

हेलिकॉप्टर अत्यंत कमी उंचीवरुन उडत आहे. आधी ते एका कारला धडकतं आणि नंतर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतं पण शेवटी एका कारला ते धडकतं. सुदेैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या अपघातातील जखमींवर उपचार चालू आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्री आणि संजय राऊतांनी शरद पवारांची शिकवणी लावावी”

“शिवसेना-भाजपच्या भांडणात…”; प्रताप सरनाईक यांचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

“मगरी असलेल्या विहिरीत टांगलं…” पुण्यातील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक प्रताप

मोठी बातमी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड खलबतं

“वरुण सरदेसाई… आता आलास तर तू परत जाणार नाहीस”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More