बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बेताल वक्तव्य करणारे कोण हे सर्वांनाच माहिती, इथे धमकीला कोणी घाबरत नाही”

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र एकनाथ शिंदे त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे व शरद पवारांनी केला. त्यात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना थेट आव्हान दिल्याने वातावरण अधिकच तापलं. या राजकीय घडामोडींवर आता उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. बेताल वक्तव्य करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे, असा अप्रत्यक्ष टोला उदयनराजेंनी लगावला आहे. तर धमकीला कुणी घाबरत नाही. जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं मी पाहतो, असा थेट इशारा उदयनराजेंनी दिला आहे.

दरम्यान, ही आघाडी फारकाळ टिकणार नाही. हे सरकार पडणार आहे. हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत ते सरकारमध्ये राहतील, असं सूचक वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंना काळजी नाही कारण त्यांना माहितीये ‘त्यावेळी’ इंदिरा गांधी अजिंक्य राहिल्या!

‘तुम्ही फक्त सतरंज्या झटका’, महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले

शिवसेनेला आणखी एक झटका, ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

‘हा भाजपचा डाव’, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया

‘बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा..’, महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममता बॅनर्जींची उडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More