नवी दिल्ली | देशाच्या एकतेला आपलं प्राधान्य राहिल अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी. तसेच देशाच्या एकतेचा सर्वांनी सन्मान करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला केलं आहे.
चौरी-चौरा शताब्दी महोत्सवानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मोदींच्या हस्ते एका टपाल तिकीटाचे उद्धाटन केलं.
कोरोना काळात देशाच्यासमोर जी आव्हानं होती, त्यावर तोडग्यासाठी यंदाचं बजेट नवा वेग देईल. अनेक दशकांपासून आपल्या देशात कोणाच्या नावाने काय घोषणा केली इतकाच बजेटचा अर्थ राहिला होता. बजेटला वोट बँकेच्या हिशोबाची वही बनवून ठेवलं होतं, अशा शब्दांत बजेटवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना मोदींनी मोडीत काढलं.
दरम्यान, आपला शेतकरी अधिक सशक्त झाला तर कृषी क्षेत्रात होत असलेली प्रगती आणखी वेग घेईल. यासाठी बजेटमध्ये अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. बाजार शेतकऱ्यांच्या फायद्याचा व्हावा यासाठी 1000 आणखी बाजारांना ई-नामशी जोडण्यात येणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
ठाकरे सरकारने पंकजा मुंडेंचं ‘ते’ धोरण ठेवलं कायम
“अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे”
‘राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
“…तुम्ही पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवा, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नका”
“बारामती अॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा मग गाझीपूरला जावा”