बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जॅकी श्राॅफच्या मुलीचा लुक पाहून सर्वच झालेत हैराण, चाहते देखील म्हणाले… पाहा फोटो

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्राॅफची मुलगी सध्या सतत तिच्या बोल्ड अंदाजांमुळे चर्चेत आहे. जॅकीच्या मुलीचं नाव कृष्णा श्राॅफ असं आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असून तिच्या नवीन लुकच्या फोटोंना पाहून सर्वच हैराण झाले आहेत. एवढंच नाही तर तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी देखील जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.

‘नॉट योर बेब’ असे कॅप्शन देत कृष्णाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चार फोटो शेअर केले आहेत. कृष्णाने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. कधी या बोल्ड फोटोंमुळे तर कधी रिलेशनशिप स्टेटसमुळे कृष्णा सतत चर्चेत असते.

कृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे. शरीराच्या अनेक भागांवर तिने टॅटू गोंदवले आहेत. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे.

दरम्यान, कृष्णाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ‘पहिल्यांदा तुला कपड्यांत पाहिले,’ असे एका युजरने लिहिले आहे तर अन्य एकाने ‘पूर्ण कपड्यांत तू सुंदर दिसतेय,’ अशी कमेंट करत, कृष्णाची फिरकी घेतली आहे. तर नशीब, तू कपडे घातलेस, असे एकाने लिहिले आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

थोडक्यात बातम्या-

अन् त्या महिलेवर कॅमेरा फोकस होताच प्रेक्षकांनी सुरू केला टाळ्यांचा कडकडाट

“आता वाटायला लागलय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्‍णालयात दाखल

‘…त्यामुळे ईडीने माझ्या विनंतीचा विचार करावा’; अनिल देशमुखांचं ईडीला पत्र

नशिबाचा खेळ! लग्नाला जाणारी वऱ्हाडीची गाडी कोसळली थेट दरीत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More