बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024 ला मोदीच सत्तेत येणार, लोकं मोदींवरच विश्वास ठेवणार”

मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे(NCP) सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट घेतली. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला (BJP) सतेतून पायउतार व्हावे लागेल. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढावीचं लागेल, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसला (Congress) वगळून सगळ्या पक्षांना एकत्र आणूण मोट बांधण्याचे ममता-पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता या राजकीय बैठका होत आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच ममता बॅनर्जींच्या कालच्या दौऱ्यामध्ये  उद्योग आकर्षित करणे हा मुख्य दिखाऊपणा होता. मूळ अजेंडा तो राजकीय होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सगळ्यांनाच हे मान्य असेल की, 2024 ला मोदीचं (PM Narendra Modi) सत्तेत येणार आहेत. त्यामुळे त्यांना हरवण्यासाठी म्हणून काय रणनीती करता येईल, सगळ्यांना कसं एकत्र येता येईल, यासाठी ही खलबतं चालली आहेत. असले प्रयोग 2019 सालीही झाले. त्या प्रयोगांना यश आलं नाही. 2024 लाही लोकं मोदींवरच विश्वास ठेवतील, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, सगळ्यांच्या भानगडीमध्ये लक्षात येतंय की, काँग्रेसला बाजूला ठेवून तिसरी आघाडी करण्याचे ममता बॅनर्जींचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला पवार साहेबांची साथ दिसतीय. त्याला काल काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. हा सामना त्यांचा अंतर्गत आहे. नंतर मग आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“काॅंग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही”

“जागा किती तर 56 अन् बाता मात्र मोठ्या”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार?; ‘या’ तीन नावाची जोरदार चर्चा

“मंत्रीच पायघड्या घालतात, ‘ती’ भेट घेऊन शिवसेनेनं महाराष्ट्र द्रोह केला”

‘या’ कंपनीच्या फोनचा मोठ्ठा स्फोट, ब्रँडचं नाव ऐकाल तर धक्काच बसेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More