बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सगळे मरणार, फक्त राजकारणी जिवंत राहणार – प्रविण तरडे

मुंबई | एमपीएससीची मुख्य परीक्षा पास झालेला विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने मुलाखत न झाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. या घटनेची सर्व स्तरावरून निंदा केली जात आहे. फक्त राजकीय वर्तुळातच नाही तर चित्रपटसृष्टीतही या घटनेची निंदा केली जात आहे. या घटनेनंतर भडकलेल्या मराठी दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी राजकारण्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

या जगात फक्त राजकारण्यांनी जगायचं का? त्यांच्या पोरा-बायकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी जगायचं? आणि सामान्य माणसांनी मरायचं, त्यामुळे आपण यांच्याबदद्ल गोड-गोड बोलणं बंद केलं पाहिजे. आणि यांची गोड-गोड भाषण ऐकणं बंद केलं पाहिजे. नाहीतर शेतकरी मरणार, एमपीएससी करणारे मरणार, कला क्षेत्रातली माणसं मरणार, जगणार कोण राजकारणासंबंधातली लोकं?, स्वप्निलच्या आत्महत्येच्या घटनेवर बोलताना प्रविण तरडे यांनी साम या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यवस्था आणि राजकारण्यांबद्दलचा संताप व्यक्त केला.

हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला, अशा दररोज चर्चा सुरू आहेत. या सगळ्यांसाठी वेळ आहे आणि इथे तरुण पोरं मरताहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ नाहीये का?, असा संतप्त प्रश्न तरडे यांनी केला आहे.

दरम्यान, आई- बाबांची आणि तुमची स्वप्न निरर्थक व्यक्तींसाठी वाया घालवू नका आणि जीव देऊ नका, असं आवाहन करत तरडेंनी तरुणांना धीर न सोडता संयमानं वागण्याची विनंती केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, आम्ही त्यांना पुरुन उरलो- देवेंद्र फडणवीस

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप- संभाजी भिडे

‘…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना ते पत्रं लिहिलं’; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मोदी पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नाहीतर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आलेत- भाजप

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा तापली, सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More