बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! सर्वांची कोरोना संकटातून अखेर सुटका होणार; ‘या’ संशोधनाचा निष्कर्ष आला समोर

नवी दिल्ली | कोरोनाने सध्या जगभर थैमान घातलं आहे. अनेक देशांमध्ये तिसरी व चौथी लाट देखिल आल्याचं चित्र पाहायला मिळालं. भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी उपचाराअभावी लोकांचा मृत्यू होत आहे. यावरच जर्नल सायंटिफिकने संशोधन केलं असून त्यांचा निष्कर्ष सकारात्मक दृष्टीने पुढे आला आहे.

जर्नल सायंटिफिकने संशोधन करून एक अहवाल मांडला आहे. या अहवालात त्यांनी म्हटलं की, थंडीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतील आणि उन्हाळ्यात ते कमी होतील. त्याबरोबरच जे देश उत्तर आणि दक्षिणेकडे आहेत, त्याच देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. तोच भूमध्य रेषेजवळ जे देश आहे, त्या देशात सर्वात कमी कोरोनाची रुग्णसंख्या आहे. जवळपास 117 देशातील आकडेवारीवरून जर्नल सायंटिफिकने हे संशोधन पूर्ण केलं आहे.

गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही कोरोनाचा उद्रेक अजूनही सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे आणि आता आलेल्या संशोधनाच्या अहवालानुसार लवकरच कोरोना हे जग सोडणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

या वर्षभरात कोरोनाच्या लाटा अनेकदा उसळत असल्या तरी त्या आता लवकरच कमी होणार असून येणाऱ्या काळात संपूर्ण जग कोरोनामुक्त होईल, असा निष्कर्ष जर्नल सायंटिफिकने आपल्या अहवालातून काढला आहे. त्यामुळे या अहवालात नमूद केल्याप्रमाणे जर कोरोना आटोक्यात आला आणि हे जग सोडून गेला तर संपूर्ण जग सुटकेचा नि:श्वास टाकेल हे नक्की.

थोडक्यात बातम्या –

पंढरपूरमध्ये पुन्हा पोटनिवडणूक घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

“चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला तर त्या मागचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही”

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

फक्त 12 रुपयांत 2 लाखांचा विमा; मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत सहभागी झालात का?

…अन् चक्क स्मशानभूमी बाहेर हाऊसफुल्लचा फलक; कोरोनामुळे विदारक परिस्थिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More