बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सगळं केंद्राने करावं आणि केंद्राने द्यावं, मी फक्त मर्सिडीज चालवणार”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधत मोठी घोषणा केली होती. गेल्या 2 वर्षांपासून सर्वसामान्य लोकांसाठी बंद असलेली लोकल सेवा आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून लोकल सेवा होईल. त्यानंतर भाजपने लोकलबाबत केलेलं आंदोलन यशस्वी झालं, असं म्हणतं भाजपने श्रेय घेतलं आहे. त्यानंतर आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

सगळं केंद्राने करावं आणि केंद्रानं करावं. मी फक्त घरात बसणार नाहीतर मर्सिडीज चालवणार आणि सरकारमधून ठेकेदारीची बिेले काढणार, हेच सरकारचं धोरणं आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. सविनय कायदेभंगाच्या लढ्यामुळे 15 ऑगस्ट 2021 नंतर मुंबईकर स्वतंत्र्य झालेत, असंही केशव उपाध्ये म्हणाले.

भाजपच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी आली. पण दोन लस घेतलेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट का ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता. पण लसीच्या डोसच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू अँपचा वापर का करत नाही?, असा सवाल देखील केशव उपाध्ये यांनी केली आहे.

दरम्यान, दोन डोस घेतलेल्या नागिरकांना लोकल सेवेचा लाभ घेता येणार आहे. ज्या नागरिकांचे दोन डोस घेऊन पुर्ण झाले आहेत आणि ज्यांचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पुर्ण झाले आहेत. केवळ त्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी लोकांना एका अँपवर रजिस्टर करावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत खलबतं सुरुच; देवेंद्र फडणवीस पुन्हा अमित शहांच्या भेटीला

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ हजार पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक; आज ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

राज कुंद्राच्या अटकेनंतरही शिल्पाच्या बहिणीची बिग बाॅसमध्ये एंट्री, पाहा व्हिडीओ!

“पंतप्रधान मोदी तुम्ही सभागृहात या अन् हिम्मत असेल तर चर्चा करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More