“मलिकांविरोधात ईडीजवळ पुरावे, दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे”
मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन राज्यातील वातावरण जोरदार पेटलं आहे. विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्यासाठी ठिकठिकाणी आज मोर्चे काढले आहेत. या मोर्चामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मलिकांचा लगेच राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा फडणवीसांनी घेतला आहे.
आपण दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाही दाऊदच्या गुंडाविरोधात हा संघर्ष आहे. हसीना पारकरने बॉंम्बस्फोटाचा कट रचला. ईडीजवळ मलिकांविरोधात पुरावे आहेत. दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.
दरम्यान, भाजपच्या मोर्चांमुळे वातावरण ढवळून निघाली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
थोडक्यात बातम्या –
“शरद पवारांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय”
“सरकार आणखी खोलाशी जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल”
“कुणी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सरकार 5 वर्षे टिकणार”
“देवेंद्र आहेत ते, तळपती तलवार, भ्रष्टाचाऱ्यांनो आता लवकरच…”
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बाॅम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….
Comments are closed.