महाराष्ट्र मुंबई

“टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले”

मुंबई | टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात काही पुरावे सापडले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात काही पुरावे सापडल्याने यापुढे त्यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे आश्वासन देऊ शकत नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांनी या याचिकेवरील सुनावणी तहकूब करत असल्याचं स्पष्ट केल्याने पोलिसांनी 15 जानेवारीपर्यंत कारवाई न करण्याचं आश्वासन न्यायालयाला दिलं.

वृत्तवाहिन्यांना महसूल मिळावा यासाठी अधिक जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी काही वृत्तवाहिन्यांनी टीआरपी घोटाळा केल्याची तक्रार गेल्या वर्षी बार्कने पोलिसांकडे केली. बुधवारी न्यायालयाने यासंबंधी दाखल करण्यात आलेली याचिका युक्तिवाद न ऐकताच तहकूब केली.

आम्हाला रिपब्लिक टीव्ही व मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले आहेत. आम्ही आधी दिलेले आश्वासन कायम ठेवू शकत नाही. मात्र, आता ही आणीबाणी आल्याने आम्ही आमचं आश्वासन 15 जानेवारीपर्यंत पाळू,
असं सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘या’ भाजप नेत्याची चौकशी होणार; मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

“आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत”

नामांतरावरुन राजकारण खेळू नका, संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत- बाळासाहेब थोरात

‘संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिलं’; सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या