बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनू सूदच्या अडचणीत वाढ???, आयकर विभागाच्या हाती लागली ‘ती’ कागदपत्रे!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात केलेल्या मदतीमुळे त्याला गरिबांचा मसीहा म्हणून देशभरात ओळख मिळाली. सोनू सूदने केलेल्या मदतीवर अनेक राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतले होते. काल सोनू सूदच्या घरी आयकर विभागानं छापे टाकून तब्बल 20 तास घराची झाडाझडती करण्यात आली. त्यामध्ये सोनू सूदने केलेल्या करचोरीचे पूरावे आयकर विभागाच्या हाती  लागल्याची माहिती समोर येत आहे.

सोनू सूदच्या घरी आयकर विभाग गेल्या तीन दिवसापासून तपास करत आहेत. आयकर विभागाच्या हाती सोनू सूदला चित्रपटांमधून मिळालेला पैसा आणि खासगी गुंतवणूकीसंदर्भात करचोरी करण्यात आल्याचे पूरावे लागले आहेत.  त्याचबरोबर सूद चॅरिटी फाऊंडेशनची खाती आणि आर्थिक व्यवहारही तपासले जाणार असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.

सोनू सूदच्या मुंबई आणि लखनऊमधील सहा ठिकाणांवर आयकर विभागने तपास केला आहे.  आयकर विभागाकडून तपास केला जात असला तरी ही धाडी टाकण्यासारखी कारवाई नसून कागदोपत्री पडताळणी केली जात आहे, असं पीटीआयने म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई मधील जुहूमधील सहा मजली घरामध्येच परवानग्यांची पूर्तता न करता हॉटेल सूरू केल्याने मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदवर कारवाई केली होती. यांसदर्भात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली. परंतु ती याचिका  न्यायालयाने  फेटाळून लावल्यानंतर सोनू सूदने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशातच आता आयकर विभाग घराची झाडाझडती करत असल्याने सोनू सूदच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या-

ह्रद्यस्पर्शी! ‘या’ लहानग्याची पंतप्रधान मोदींना आर्त हाक; पाहा व्हिडीओ

पुणे बंद! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

…अन् भर कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींनी काढला महिलेचा मास्क; पाहा व्हिडीओ

अभिनेता मनोज वाजपेयींचे वडिल रूग्णालयात दाखल, प्रकृतीबाबतची माहिती आली समोर

‘2024 ला पण तुम्हीच पंतप्रधान…’; अभिनेत्री कंगणा राणावतच्या मोदींना खास शुभेच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More