EVM Machine Off | राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलं. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तोपर्यंत ईव्हीएम मशीन (EVM Machine Off) स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले. त्या स्ट्राँग रूमवर 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची (EVM Machine Off) नजर आहे. परंतु जळगाव येथे लोकसभा मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार घडला. ईव्हीएम ठेवलेल्या (EVM Machine Off) स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
या घडलेल्या घटनेनुसार उमेदवारांना धडकी भरली आहे. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरून ही माहिती कळवली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घडलेल्या माहितीला दुजोरा दिला. सीसीटीव्ही कॅमेरे चार मिनिटांसाठी बंद झाले असले तरी 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव येथे 13 मे रोजी मतदान झालं. तसेच या मतदानानंतर दोन्ही लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये (EVM Machine Off) ठेवण्यात आले. त्या ठिकाणी 24 तास सुरक्षा दलाचा पहारा होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे. 26 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाला. हा डिस्प्ले सकाळी 9.04 मिनिटांसाठी बंद करण्यात आला. ही माहिती आता महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
कॅमेरे बंद का करण्यात आले?
जळगावच्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. त्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने जनरेटरवरून ईन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरीत करण्यात आला, असं जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून माहिती दिली.
कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाले तरीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच ते व्हिडीओ उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
तसेच गेल्या काही दिवसांआधी बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीनचे कॅमेरे बंद करण्यात आले. हे सीसीटीव्हीचे कॅमेरे 45 मिनिटं बंद ठेवण्यात आले होते. तसेच साताऱ्यात देखील हीच स्थिती पाहायला मिळाली. साताऱ्याच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवलेले ईव्हीएम मशीनमधील कॅमेरे बंद ठेवले होते. तेव्हा सीसीटीव्हीचे काम सुरू असल्याचं सेक्युरिटीने सांगितल्याची माहिती समोर आली.
News Title – EVM Machine Off In Jalgaon Loksabha Election For 4 Minutes
महत्त्वाच्या बातम्या
तापमान गेलं चाळीशी पार; शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय करा
कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हार्दिक पांड्या; घटस्फोटानंतर नताशाला..
“गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद..”; ठाकरे गटाचा खळबळजनक दावा
हृदयद्रावक! गेमझोनमध्ये लागलेल्या आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO समोर
पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त?; जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर