बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा’; MPSC चं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थी नाराज झाले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकदा रद्दही झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एसईबीसी आरक्षण कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्लूएस पर्याय निवडण्यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन पर्याय देऊ केले आहेत. उमेदवारांना एक तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल किंवा त्यांना खुल्या प्रवर्गाचा म्हणजे ओपन पर्याय निवडावा लागेल.

SEBC प्रवर्गाऐवजी आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. उमेदवारांकडे खुल्या प्रवर्गाची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रवर्ग निवडीबाबतचं परिपत्रक काढलं आहे. 23 जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी आयोगाच्या 4जानेवारी रोजीच्या प्रसिध्दी पत्रकानुसार कोणत्याही पदभरती/परीक्षांकरीता यापूर्वी प्रवर्ग निवडला असला तरी मराठा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्यानं प्रवर्ग निवडावा लागेल.

थोडक्यात बातम्या-

सारथी संस्थेला निधीची कुठलिही कमतरता पडू देणार नाही- अजित पवार

राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका; आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

भाजपला लागणार मोठी गळती, अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर….’; सौरव गांगुलीने दिला खास सल्ला

‘सर्वगुण संपन्न असला तरी…’ खंत व्यक्त करत शिल्पा शेट्टीने केला राज कुंद्राचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More